शिरूर -शिरूर तालुक्यातील स्मशानभूमीसारख्या दुर्लक्षित भागाचा विकास करून ही ठिकाणे नागरिकांना फिरण्यासाठी झाली पाहिजेत, असा विकास या भागाचा करावा. शिरूर ग्रामपंचायतीने केलेली विकासकामे दर्जेदार असून यापुढील काळात मोठा निधी देणार आहे, असे प्रतिपादन आमदार अशोक पवार यांनी केले. शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीने केलेले स्मशानभूमीचे सुशोभीकरण कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरुर रामलिंग ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव जाधव व सदस्य यांच्या प्रयत्नातून स्मशानभूमी सुशोभीकरण व वृक्षारोपण, महादेव धोंडीबा जाधव यांच्या स्मरणार्थ सरपंच नामदेव जाधव व संपत जाधव यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या एसटी बस शेडचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अधकारी, पदाधिकारी उपस्थित होते.