औरंगाबाद – काल सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. हे चित्र फक्त मुंबई-पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यासह देश आणि जगात दिसत होतं. करोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर जगभरातील लोकांनी अत्यंत जल्लोषात नाचतगात नववर्षाचं स्वागत केलं. तसेच बरोबर 12 चा ठोका पडताच हॅपी न्यू इयर म्हणत लोकांनी एकमेकांना अलिंगनही दिली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून जोश आणि आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.
दरम्यान, या सरत्या वर्षी तळीरामांनी देखील आपली पूर्ण तहान भागवली असल्याचं दिसून आलं आहे. औरंगाबादमध्ये एकावर थर्टी फर्स्टचा चांगलाच खुमार पाहायला मिळाला. हा व्यक्ती दारू पिऊन चांगलाच झिंगला आहे. शहरातील वाळूज महानगरमध्ये थर्टी फस्टचा पहिला अवतार पाहायला मिळाला आहे.
दारू पिऊन फुल झालेला नागरिक रस्त्याच्या मधोमध झोपला होता. हा व्यक्ती एवढ्या बेधुंद अवस्थेत होता की त्याला नागरिकांनी चक्क ॲम्बुलन्समध्ये टाकून दवाखान्यात पाठवले आहे. सध्या अनेक शहरांमध्ये तळीरामांचे असे प्रकार पाहायला मिळत आहेत. तर, सोशल मीडियावर देखील या झिंगाट लोकांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. सध्या सगळीकडे नवीन वर्षाचे अतिशय आनंदात स्वागत करण्यात येत आहे.