माढा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली तोच हा माढा मतदारसंघ. माढामध्ये संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणजेच राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे. माढा मतदार संघामध्ये चुरशीची लढत सुरू आहे. कधी भाजपा तर कधी राष्ट्रवादी आघाडी घेत आहे. सध्या भाजपाने आघाडी घेतली असून राष्ट्रवादीचे संजय शिंदे दोन हजार 607 मतांची आघाडी घेतली आहे.
सुरुवातीच्या कलांमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 151972 तर संजय शिंदे यांना 149365 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याचे जाहीर करत नंतर माघार घेतल्याने माढा मतदारसंघ चर्चेत आला होता. भाजपाने विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला पक्षात घेत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला आहे.