मुंबई – अभिनेता ह्रतिक रोशन सध्या अभिनेत्री सबा आझादला डेट करत असल्याच्या चर्चा आहे. अनेकदा दोघे सोबत फिरताना दिसून येतात. कधी पार्टी दरम्यान तर कधी डिनर झाल्यानंतर दोघे सोबत दिसून येतात. या दोघांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यावरून अनेकजण ह्रतिकला ट्रोल करताना दिसत आहेत.
ह्रितिक आणि सबा डिनर करून आपल्या कारकडे जात असतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी ह्रतिक पुढे जातो आणि कारमध्ये बसण्यापूर्वी सेल्फीसाठी बाजूला उभ्या असलेल्या काही फॅन्सला अडवतो. त्यानंतर पाठीमागून सबा येते आणि दोघेही कारमध्ये निघून जातात. काही सेकंदांच्या या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी ह्रतिकवर टीकेची झोड उठवली आहे.
View this post on Instagram
ह्रतिकने त्या फॅन्सला हटकल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. काहींनी तर ह्रतिकने त्या फॅन्सला हटकण्यासाठी जोरदार धक्का दिल्याचे देखील म्हंटले आहे. तर दुसऱ्याने जरा साऊथ स्टार्स कडून शिका, चाहत्यांसोबत कस वागायचं. असा सल्ला ह्रतिकला दिला आहे. ह्रतिकचा ‘फायटर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण देखील झळकणार आहे.