जकार्ता – इंडोनेशिया सरकारने एका नव्या कायद्याचा मसुदा तयार केला असून त्याप्रमाणे देशामध्ये विवाहपूर्व शारीरिक शारीरिक संबंध ठेवण्यास बंदी घालण्यात येणार आहे एव्हढेच नाही तर विवाहनंतरही सुद्धा फक्त आपल्या जोडीदाराशीच शारीरिक संबंध ठेवता येणार आहेत या कायद्याचे पालन न करणाऱ्यांना कमीत कमी एक वर्षाचा कारावास आणि मोठ्या दंडाची शिक्षा देण्याची तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे.
या कायद्याचा मसुदा तयार असून तो लवकरच इंडोनेशियन संसदेमध्ये मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे येत्या आठवड्यात संसदेचे अधिवेशन बोलवण्यात आले असून त्यामध्ये हा कायदा मंजूर होईल याबाबत आशा सरकारी पक्षाने व्यक्त केली आहे हा कायदा मंजूर झाल्यानंतर विवाह झाला नसताना शारीरिक संबंध प्रस्थापित करणे गुन्हा मानला जाणार आहे विवाहित व्यक्तीने सुद्धा आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणाशी शारीरिक संबंध ठेवल्यास तो सुद्धा गुन्हा मानला जाणार आहे पहिल्या गुन्ह्यामध्ये जर आई-वडिलांनी आपल्या मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली तर कारवाई केली जाणार आहे.
तर दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये जर जोडीदाराने आपल्या जोडीदाराच्या विरोधात तक्रार दाखल केली तर गुन्हे नोंद करण्याची कारवाई सुरू होणार आहे या कायद्यातील प्रस्तावित तरतुदीप्रमाणे गुन्हा न्यायालयात सुनावणी सुरू होण्यापूर्वी मागे घेता येऊ शकेल एकदा न्यायालयीन कारवाई सुरू झाली की गुन्हा मागे घेता येणार नाही तीन वर्षापूर्वी सुद्धा इंडोनेशिया सरकारने अशा प्रकारचा कायदा आणण्याचा विचार केला होता पण तेव्हा देशभर विरोध झाल्याने तो प्रस्ताव मागे घेण्यात आला होता आता पुन्हा एकदा सरकारने तोच कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे.