मुंबई – अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद (Saba Azad) या दोघांची नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चा रंगलेली असते. पहिली पत्नी सुझान खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर हृतिक रोशन सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून ते एकमेकांना डेट करत आहे. अनेकदा हे दोघे एकत्र स्पॉट होताना दिसतात. याशिवाय एकत्र फोटोही सोशल मीडियावर शेअर करतात. मात्र सध्या सबाने शेअर केलेल्या एका पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे.
सबा आझादने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे ज्यावर लिहिले आहे, ‘तुमचा स्त्रीरोगतज्ज्ञ कोण आहे?’ हा फोटो शेअर करताना सबाने लिहिले की, ‘सध्या फक्त हाच प्रश्न माझ्या मनात घोळत आहे.’ तिच्या या पोस्टनंतर सबा लग्नाआधीच आई होणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावर नेटकऱ्यांनी ‘ज्युनियर हृतिक येत आहे का?,’ तू प्रेग्नंट आहे का?’ असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. तर एका नेटकऱ्याने ‘आधी लग्न कर आणि मग स्त्रीरोगतज्ज्ञाकडे जा’, असा सल्ला दिला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, हृतिकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो दीपिका पदुकोणसोबत ‘फायटर’मध्ये दिसणार आहे. 25 जानेवारी 2024 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. तसेच हृतिकचा ‘वॉर 2’ चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.