मुंबई – बॉलिवूडचा हँडसम हंक अभिनेता हृतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. हृतिकच्या लव्ह लाईफमुळे सध्या सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा आझाद दोघेही हातात हात घालून फिरताना दिसले होते. तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता दोघांचा एका एरपोर्टवरील व्हिडीओ समोर आला आहे.
ह्रितिकचा एरपोर्टवरील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो मुंबई विमानतळावर दिसत आहे. तो सबा आझादसोबत विमानतळावर पोहोचला आणि फ्लाइटमध्ये जाण्यापूर्वी त्याने सोबत आलेल्या सबाला प्रेमाने किस केल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचा हा गोड हावभाव पाहून चाहते खूप खूश झाले आहेत. हृतिक लवकरच ‘फाइटर’ आणि ‘वॉर 2’ मध्ये दिसणार आहे.
View this post on Instagram
फॅमिली गेट टुगेदरमध्ये हृतिक-सबा एकत्र दिसले
सबा आझादने हृतिकच्या फॅमिली गेट टुगेदरलाही हजेरी लावली होती. करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत दोघे हातात हात घालून फिरताना दिसले होते. त्यानंतर सबा ह्रितिकच्या बहिणीच्या जन्मदिवसाच्या कार्यक्रमात देखील दिसली होती. सबा थेट ह्रितिकच्या फॅमिली पार्टी फोटोमध्ये दिसून आल्याने चाहत्यांनी देखील हे दोघे एकमेकांना डेट करत असल्यावर शिकामोर्तब केलं होत.