मुंबई – सध्या संपूर्ण बॉलिवूडमध्ये ह्रितिक सबा आझादच्या नात्याची जोरदार चर्चा आहे. अशात ‘रॉकेट बॉईज 2’ च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान हृतिक रोशन त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत दिसला होता. ‘रॉकेट बॉईज’च्या पहिल्या सीझननंतर सबा आझादने आता दुसऱ्या सीझनमध्येही काम केले आहे. पण, या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये हृतिकच्या आगमनामुळे सिरींजमधील इतर कलाकारांची तारांबळ उडाली.
खरतर सीरिजच्या प्रीमियरनंतर सिरीजची चर्चा होणं अपेक्षित होत मात्र ह्रितिकच्या एंट्रीमुळे त्याचीच चर्चा होताना पाहायला मिळाले. ‘रॉकेट बॉईज 2’च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व स्टार्स दिसले. ह्रितिकनं या स्क्रिनिंगला हजेरी लावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
‘रॉकेट बॉईज 2’च्या पहिल्या एपिसोडच्या स्क्रीनिंगवेळी हृतिक रोशन ब्लॅक सूट आणि रंगीत गॉगल्समध्ये दिसला होता. तर सबा आझाद पांढऱ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये होती. हृतिक रोशन आणि सबा आझाद यांनी यानिमित्त बराच वेळ सोबत घालवला. यावेळी सेल्फीसाठी कोणताही चाहता येऊ नये यासाठी दोन्ही बाजूंना बाउन्सर तैनाद करण्यात आले होते.
View this post on Instagram
‘रॉकेट बॉईज’चा पहिला सीझन गेल्या वर्षी 2022 मध्ये आला होता, ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता त्याचा दुसरा सीझन 16 मार्चपासून प्रसारित होणार आहे. या मालिकेत जिम सरभ, इश्वाक सिंग, रेजिना कॅसांड्रा, सबा आझाद, रजत कपूर, दिव्येंदू भट्टाचार्य यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिरीजमध्ये सबा आझाद परवाना इराणीची भूमिका साकारत आहे. या सीरिजला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.