राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान; कोणत्या लोकसभा मतदार संघात किती मतदान?

Maharashtra Lok Sabha Election| लोकसभा निवडणूकीच्या महाराष्ट्रातील आज शेवटच्या पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. आज महाराष्ट्रात ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या लोकसभेच्या जागांसाठी मतदान होत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १५.९३ टक्के मतदान झाले आहे. आठ राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मतदान सर्वात कमी झाले आहे. तर राज्यात आतापर्यंत सर्वात जास्त मतदान दिंडोरीमध्ये आणि सर्वात कमी मतदान कल्याणमध्ये झाले आहे.
पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी Maharashtra Lok Sabha Election|
मुंबई उत्तर – १४.७१ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – १७.५३ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – १७.०१ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – १५.७३ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- १६.६९ टक्के
मुंबई दक्षिण – १२.७५ टक्के
नाशिक – १६.३० टक्के
धुळे- १७.३८ टक्के
दिंडोरी- १९.५० टक्के
पालघर- १८.६० टक्के
भिवंडी- १४.७९ टक्के
कल्याण – ११.४६ टक्के
ठाणे – १४.८६ टक्के.
हेही वाचा:
शांतीगिरी महाराज पुन्हा अडचणीत? ; ईव्हीएम मशीनमध्ये देवाचा वास असल्याचे म्हणत घातला यंत्राला हार





