शांतीगिरी महाराज पुन्हा अडचणीत? ; ईव्हीएम मशीनमध्ये देवाचा वास असल्याचे म्हणत घातला यंत्राला हार

Nashik Lok Sabha Shantigiri Maharaj । लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यतील १३ जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीय. त्यातच नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनीही सकाळी लवकर मतदान केलं. मात्र मतदानानंतर त्यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पोलिंग बूथला घातला हार Nashik Lok Sabha Shantigiri Maharaj ।
आज सकाळी मतदानाला सुरुवात होताच शांतीगिरी महाराज नाशिकमधील मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांनी मतदान करण्याआधी ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या पोलिंग बूथला पुष्पहार घातला. महाराज पोलिंग बूथला हार घातल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यासंदर्भात तक्रार झाल्यास शांतीगिरी महाराजांच्या अडचणी वाढू शकतात.
विजय आमचाच होणार Nashik Lok Sabha Shantigiri Maharaj ।
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शांतीगिरी महाराजांनी माध्यमांसोबत संवाद साधला. भाजपसह सर्व हिंदुत्त्ववादी संघटनांचा आपल्याला पाठिंबा आहे. त्यामुळे विजय आमचाच होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदाची निवडणूक आम्हाला जिंकायची आहे. मतदार आम्हाला भरभरुन मतदान करतील, असे महाराज म्हणाले.
ईव्हीएमला हार का घातला, असा प्रश्न महाराजांना विचारण्यात आला. त्यावर मतदान पवित्र आहे. या यंत्राजवळ मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांना सद्बुद्धी व्हावी. त्यांचं मत भारतमातेच्या कामी यावं म्हणून ईव्हीएमला हार घातल्याचं त्यांनी सांगितलं.





