स्मृती इराणी यांनी अमेठीत बजावला मतदानाच हक्क ; रांगेत उभे राहून केले मतदान

Smriti Irani । लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून उत्तर प्रदेशातील 14 लोकसभा जागांवर मतदान सुरू आहे. दरम्यान, या ठिकाणीअमेठी लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मतदान केले. स्मृती इराणी या मेदन मावई गावात मतदारांच्या रांगेत उभ्या राहिल्या. त्यानंतर त्यांनी मतदान केल्याचे दिसून आले.
तुमच प्रत्येक मत अमेठीच्या विकासाला Smriti Irani ।
मतदान केल्यानंतर माध्यमां ना प्रतिक्रिया देताना स्मृती इराणी म्हणाल्या,” आज गौरीगंजमध्ये, विकसित भारताच्या निर्धाराने, गरीब कल्याण आणि महिला शक्तीसाठी समर्पित राष्ट्रसेवकाला मी माझे मत दिले हे माझे भाग्य आहे.” असे त्यांनी म्हटले. तर मतदानापूर्वी स्मृती इराणी यांनी ट्विटरवर मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले होते. यात त्यांनी, “माझ्या अमेठीच्या कुटुंबियांनो… तुमच प्रत्येक मत अमेठीच्या विकासाला आणि अमेठीच्या लोकांच्या सेवेसाठी सुरू असलेल्या कामांना नवी दिशा देईल. स्थानिक पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था मजबूत होण्यास हातभार लागेल. तुमच्या बहिणीला तुमचा मतदानाचा हक्क बजावा.
यह मेरा सौभाग्य है कि आज गौरीगंज में विकसित भारत के संकल्प के साथ, गरीब कल्याण एवं महिला शक्ति को समर्पित एक राष्ट्रसेवक को मैंने अपना मत दिया: @SmritiIrani जी pic.twitter.com/JAEkdMVpzJ
— Smriti Irani Office (@SmritiIraniOffc) May 20, 2024
त्या पुढे म्हणाल्या “लोकशाहीचा सण, देशाची शान… आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाचा दिवस आहे. सर्व आदरणीय मतदारांनी मतदान करावे, ही विनंती. तुमचे प्रत्येक मत ‘विकसित’चा आधार आहे. भारताला जागतिक मंचावर अग्रगण्य आणि स्वावलंबी बनवण्यात अमूल्य सिद्ध होईल.” असे त्यांनी म्हटले.
49 जागांसाठी एकूण 695 उमेदवार रिंगणात Smriti Irani ।
पाचव्या टप्प्यात लोकसभेच्या 49 जागांसाठी एकूण 695 उमेदवार रिंगणात आहेत. आज महाराष्ट्रातील १३, उत्तर प्रदेशातील १४, पश्चिम बंगालमधील सात, बिहारमधील पाच, झारखंडमधील तीन, ओडिशातील पाच आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात कमीत कमी (४९) जागांवर मतदान होणार आहे.





