पिंपरी – सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून आरोपीने महिलेचा अश्लील व्हिडिओ काढला होता. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी पैशांची मागणी करत महिलेचे 30 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
हा प्रकार 6 जुलै रोजी ऑनलाईन पद्धतीने झाला. या प्रकरणी पीडित महिलेने गुरुवारी (दि. 10) सांगवी पोलीस ठाण्यात फिरत दिली आहे. फिर्यादीनुसार सांगवी पोलिसांनी या इंस्टाग्राम अकाउंट धारक व मोबाइल धारकावर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी व पीडित महिला यांच्यातील इंस्टाग्राम वरून ओळख झाली. त्यांनी स्वतःचे मोबाइल नंबर शेअर करत ओळख वाढवली. फिर्यादी यांना व्हिडिओ कॉल करत त्यांचा अश्लील व्हिडिओ काढला. पुढे हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून 29 जुलै ते सहा ऑगस्ट या कालावधीत वेळोवेळी असे ऑनलाइन पद्धतीने तीस हजार रुपये घेतले.