Thailand Open 2024 : – सात्विकसाईराज-रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय पुरुष दुहेरी जोडीने थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आश्वासक सुरुवात करताना आपल्या मोहिमेचा विजयी प्रारंभ केला. तर दुसरीकडे, एच.एस. प्रणॉयचे स्पर्धेतील पहिल्याच फेरीत पराभूत झाल्याने आव्हान संपुष्टात आले.
सात्विक आणि चिराग या जोडीने पुरुष दुहेरी स्पर्धेत मलेशियाच्या नूर मोहम्मद अयुब अझरिन आणि टॅन वेई किओंग यांचा पराभव करून स्पर्धेत आगेकूच केली. अव्वल मानांकित भारतीय जोडीने 34 मिनिटांत 21-13, 21-13 असा विजय मिळवला. आता त्यांचा सामना चीनच्या शी हाओ नान आणि झेंग वेई हान यांच्याशी होईल.
त्याचवेळी पाचव्या मानांकित प्रणॉयला देशबांधव मेराबा लुवांग मेसनमने २१-१९, २१-१८ असे पराभूत केले. आता मेराबाचा सामना डेन्मार्कच्या मॅड्स क्रिस्टोफरसनशी होईल, ज्याने भारताच्या किरण जॉर्जचा २१-१५, १३-२१, २१-१७ असा पराभव केला आहे.
Federation Cup 2024 : गोल्डन बॉय पुन्हा चमकला, फेडरेशन कपमध्ये नीरज चोप्राला सुवर्णपदक….
अश्मिता चालिया दुसऱ्या फेरीत
महिला एकेरीत अश्मिता चालिहाने इंडोनेशियाच्या एस्टर नुरुमी ट्राय वार्डोयोचा 19-21, 21-15, 21-14 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली आहे. आता तिचा सामना अव्वल मानांकित चीनच्या हान युईशी होणार आहे. युईने भारताच्या मालविका बनसोडचा 21-11, 21-10 असा पराभव केला. उन्नती हुडाचाही पहिल्या फेरीत बेल्जियमच्या लियान टॅनकडून २१-१४, १४-२१, ९-२१ असा पराभव झाला.