नवी दिल्ली : सुधारीत नागरीकत्व कायदा (का) आणि राष्ट्रीय नागरिकत्व सुची (एनआरसी) कायद्या विरोधातील निदर्शने आणि हिंसाचाराचे फेसबुक लाईव्ह करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि एकल पालक असणाऱ्या सदाफ जाफर यांना 19 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यांची सुटका करण्याच्या चेंज डॉट ओआरजीच्या मागणीला 46 हजार जणांनी पाठींबा दर्शवला आहे. दरम्यान ट्विटरवरही #freesadafJafar हा हॅशटॅग जोरात चालत आहे.
चेंज डॉट ओराजीच्या आवाहनाचा आशय असा : सदाफ या शिक्षक आहेत. एकल माता अहेत. सर्व गुण संपन्न आणि खंबीर अशी स्त्री आहे. या क्षणाला ती कारागृहात गजाआड आहे. त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे. त्यांचा दोष एकच – या देशाचा एक नागरिक म्हणून त्यांनी आंदोलनात भाग घेतला. त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यात त्यांना अनेक जखमा झाल्या अहेत. निदर्शनांचे फेसबुक लाईव्ह करताना त्यांना अटक करण्यात आली आहे.
चित्रपट निर्मात्या मिरा नायर यांनी ट्विटरवर आपला राग व्यक्त केला आहे. त्या म्हणतात, सदाफ कारागृहात 12 दिवस सडत आहे. त्यांचा आतोनात छळ करण्यात येत आहे. गोठवून टाकणाऱ्या थंडीत त्यांना कारागृहाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरीस आपण तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचीही अखेर करूया. #freesadafJafar
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नायर यांनी जाफर यांच्या यांच्यावरील संकटावर भाष्य केले. एक असामान्य शिक्षक, एकल माता आणि कार्यकर्त्या असणाऱ्या सदाफ जाफर यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्या 19 डिसेंबरपासून कारागृहात आहेत. त्यांना औषधे घेऊ दिली जात नाहीत. त्यांना अंतर्गत रक्तस्त्राव होत आहे. कारागृहात गोठवून टाकणारी थंडी आहे. त्यांना गादीही दिली जात नाही. केवळ एक ब्लॅंकेट देण्यात येते. तिची मुले लहान आणि एकटी अहोत. तिच्या परतण्याची कोणतीही आशा नाही. त्यांनी कारागृहात डांबले आणि जणू त्याची चावी फेकून दिली आहे, ासे त्या म्हणाल्या.
प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट यांनीही याबाबत एक ट्विट केले आहे. त्याला 500 जणांनी री ट्विट केले आहे.