कोलंबो : भारत-श्रीलंका दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी-२० क्रिकेट मालिकेला ५ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. टी-२० सामन्याच्या मालिकेसाठी माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजचा श्रीलंका संघात समावेश करण्यात आला आहे. बुधवारी श्रीलंकेच्या टी-२० संघाची घोषणा करण्यात आली.
Sri Lanka T20I squad for India tour 2020 – https://t.co/JV77409Pd0#INDvSL pic.twitter.com/UCZAYcmcOz
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) January 1, 2020
३२ वर्षीय अष्टपैलू मॅथ्यूज सोळा महिन्यांनतर टी-२० संघात सहभागी झाला आहे. त्याने आपला शेवटचा टी-२० सामना २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूध्द खेळला होता.
श्रीलंकेच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाकडे देण्यात आली आहे. गोलंदाज नुवान प्रदिपला सरावादरम्यान दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागी कासुन राजिता याला संधी देण्यात आली आहे.
श्रीलंका संघ : लसिथ मलिंगा (कर्णधार), दानुष्का गुणतालिका, अविष्का फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, दसुन शनाका, कुसल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डीसिल्वा, इसरू उदाना, भनुका राजपक्ष, ओशादा फर्नांडो, वानिंडू हसरंगा, लाहिरू कुमारा, कुसल मेंडिस, लक्षण संदाकन आणि कासुन राजिथा.