पुणे ( प्रभात वृत्तसेवा ) – महापालिकेच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वसाहत सहकारनगर नं. 2 येथे घरेलू कामगार, महिला कामगार तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीमेचे आयोजन केले होते.
यावेळी सुमारे 200 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. हेमंत बागूल यांनी या लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते.
घरेलू काम करणाऱ्या कष्टकरी महिला तसेच कामगारांना कामावर येण्यापूर्वी लसीकरण करणे बंधनकारक केले आहे. तर, ऑनलाइन नोंदणीत अडचणी येत नसल्याने या नागरिकांचे लसीकरण करण्यात अडचणी येतात ही बाब लक्षात घेऊन बागूल यांच्या पुढाकाराने ही लसीकरण मोहीम घेण्यात आली. तसेच, या नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठीही विशेष शिबिर घेतले जाणार आहे.
राम रणपिसे, कुमार खटावकर, हबीब शेख, निखिल सोनावणे, सुयोग धडवे, आकाश खटावकर, इर्शाद शेख व जय हनुमान मित्र मंडळाचे त्रंबक अवचिते, विनोद गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.