नवी दिली – भारतीय जनता पक्षाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपले व्हिजन डॉक्युमेंट जारी केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन केले.
भाजपने या जाहीरनाम्याला ‘प्रजा ध्वनी’ असे नाव दिले आहे. भाजपच्या या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता बेंगळुरू येथील पक्षाच्या मुख्यालयात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध केला.
कर्नाटक भाजपच्या व्हिजन डॉक्युमेंटचे महत्त्वाचे मुद्दे-
१. कर्नाटकात समान नागरी संहिता लागू होणार आहे. मुस्लिम आरक्षण संपवण्याचाही उल्लेख आहे.
२. जाहीरनाम्यात कृषी क्षेत्रावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. शेतकरी विमा, बियाणे खरेदीसाठी 10 हजारांची मदत करण्यात येणार आहे.
३. अॅग्रो फंडाच्या नावाने शेतकऱ्यांसाठी आपत्कालीन निधी. शहरातील 5 लाख गरिबांना घरे, तर ग्रामीण भागातील 10 लाख गरिबांना घरे देण्याचे आश्वासन दिले आहे. सर्व वॉर्डात अटल आहार केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
४. बीपीएल कुटुंबांना दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध दिले जाणार आहे. 10 किलो तांदूळ दिला जाईल.
५. दलित, आदिवासी महिलांसाठी एक ओबवा सामाजिक न्याय निधी योजनेचे आश्वासन दिले आहे.