मुंबई – ‘सैराट’ या लोकप्रिय चित्रपटातील आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकु राजगुरु पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या ‘खिल्लार’ या चित्रपटात ती झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त रिंकू राजगुरुने इन्स्टाग्रामवर ‘खिल्लार’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये दोन बैल शर्यतीत धावताना दिसत आहे. यावर चित्रपटाचे नाव पाहायला मिळत आहे. ही पोस्ट शेअर करत ‘महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना “खिल्लार” शुभेच्छा. भिर्रर्रर्र… महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल रांगडा खेळ… बैलगाडा शर्यत यावर लेखक-दिग्दर्शक मकरंद शशिमधु माने यांनी खिल्लार या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. या सिनेमाचा आम्ही भाग आहोत याचा आम्हाला आनंद आहे,’ असे रिंकू राजगुरुने कॅप्शनमध्ये लिहीले आहे.
View this post on Instagram
येत्या काही दिवसांत या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे.या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना मोठं महत्त्व असल्याने या चित्रपटाकडून अनेकांना भरपूर अपेक्षा असणार आहे. एक नवा आणि वेगळा चित्रपट पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. मात्र यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. कारण हा चित्रपट पुढील वर्षी 2024 ला रिलीज होणार आहे.