Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांचे मतदान पार पडले आहे, उर्वरित तीन टप्प्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. उमेदवारांपासून ते स्टार प्रचारक आणि नेते अगदी घरोघरी जाऊन मत मागत आहे.अशात सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे.
अशात महायुतीच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार दिसत नसल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. बारामती मतदारसंघातील मतदान पार पडल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत कुठे, असा प्रश्न विचारला जात आहे. नुकताच पंतप्रधान यांच्या मुंबई येथे भव्य रोड शो झाला यावेळी सुद्धा अजित पवार गैरहजर होते यावरूनही अजित पवार नेमके कुठे आहे असा प्रश्नच विचारला जात आहे.
याच चर्चांवरून शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले,’ बारामतीचे मतदान झाल्यापासून अजित पवार खरंच आजारी आहेत, अशी माझी माहिती आहे. त्यामुळे ते कुठे दिसत नसवाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात तसेच महायुतीच्या प्रचाराला त्यांची गैरहजेरी दिसत आहे. यावरून विविध वावड्या उठल्या असताना आता शरद पवारांनीही यावर भाष्य केले आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली असता त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, बारामतीचे मतदान झाल्यापासून अजित पवार खरंच आजारी आहेत, अशी माझी माहिती आहे. त्यामुळे ते कुठे दिसत नसवाते.’ असेही ते पत्रकार परिषदेत म्हणाले आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या राज्यातील दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस होते मात्र अजित पवार उपस्थित नसल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.