Ghatkopar hoarding tragedy मुंबईतील घाटकोपरमध्ये सोमवारी 13 मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात अपघातातील मृत व्यक्तींच्या संख्येत वाढ झाली आहे.
आतापर्यंत यात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 75 जण जखमी झाले असून यातील 43 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे या दुर्घटनेत निष्पाप १६ जणांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेच्या चौथ्या दिवशी मदत आणि बचावकार्य पूर्ण झाले. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी माहिती दिली.
मुंबईत होर्डिंग कोसळतानाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ#Mumbai #ghatkopar pic.twitter.com/tFriClz9fO
— jitendra (@jitendrazavar) May 16, 2024
अशातच या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ केवळ १७ सेंकदाचा असलेला हा व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. क्षणात होत्याचे नव्हते झाल्याचे द्दश्य त्या व्हिडिओतून दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
दरम्यान, या घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत अनधिकृत होर्डिंग हटवण्याचे आदेश दिले. याशिवाय मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. याप्रकरणावर आता काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
हे वाचले का ? घाटकोपर घटनेनंतर अमेरिकेतून मुलाची मदतीसाठी आर्तहाक,’आई-वडिलांना शोधा’