Share Market| शेअर बाजाराची आज तेजीसह सुरुवात झाली आहे. आयटी निर्देशांक आणि मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजारात तेजी आली आहे. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये बाजाराची सुरुवात हिरव्या चिन्हावर झाली आहे. बीएसई सेन्सेक्स ३०५ अंकांच्या वाढीसह ७३,२९२ अंकांवर तर निफ्टी ९० अंकांच्या वाढीसह २२,२९० अंकांवर उघडला.
BSE सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी १७ शेअर्स वधारत आहेत आणि १३ घसरणीसह व्यवहार करत आहेत. सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये भारती एअरटेल ३ टक्क्यांहून अधिक आणि एचसीएल टेक १.६१ टक्क्यांनी आणि टेक महिंद्रा १.५४ टक्क्यांनी जास्त आहे. याशिवाय इन्फोसिस, विप्रो, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक यांचे शेअर्सही वधारले आहेत. Share Market|
कोणत्या शेअर्समध्ये वाढ आणि घसरण?
NSE निफ्टीच्या ५० समभागांपैकी २४ समभागांमध्ये वाढ तर २६ समभाग घसरत आहेत. भारती एअरटेल ३ टक्क्यांनी वाढून अव्वल स्थानावर आहे. यानंतर टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस, ओएनजीसीच्या शेअर्समध्ये मजबूत आहे. तर मारुतीमध्ये सर्वात जास्त घसरण झाली असून, डीव्हीची लॅब १.४० टक्क्यांनी घसरली आहे. तसेच श्रीराम फायनान्स, अदानी एंटरप्रायझेस आणि बजाज ऑटोचे शेअर्स सर्वाधिक तोट्यात आहेत.
एलटीआय माइंडट्री, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, विप्रो, इन्फोसिस आणि हीरो मोटोकॉर्प या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या कामकाजात तेजी दिसून आल्याचे पाहायला मिळाले. तर पॉवर ग्रिड, मारुती, कोल इंडिया, टाटा मोटर्स, एनटीपीसी, सिप्ला आणि डिव्हिस लॅबच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. Share Market|
शेअर बाजारातील मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांपैकी ओएनजीसी, इंजिनिअर्स इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टीसीएस, कोटक महिंद्रा बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. तर लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स घसरणीवर होते.
बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी लाल रंगात बंद
तर बुधवारी (१५ मे) रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स ११७ अंकांनी घसरला. तर निफ्टी २२,२२० च्या पातळीवर आला. लहान आणि मध्यम समभागात मात्र चांगली वाढ झाली. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.६० टक्क्यांच्या वाढीसह आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.९६ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. कॅपिटल गुड्स, पॉवर आणि युटिलिटी समभागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली.
व्यवहाराच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स १७.५८ अंकांनी किंवा ०.१६ टक्के घसरून ७२,९८७.०३ वर बंद झाला. तर NSE चा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी १७.३० अंक किंवा ०.०७८ टक्केच्या घसरणीसह २२,२००.५५वर बंद झाला होता.
हेही वाचा :
“इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात आलं तर…”; ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा