Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांचे मतदान पार पडले आहे, उर्वरित तीन टप्प्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. उमेदवारांपासून ते स्टार प्रचारक आणि नेते अगदी घरोघरी जाऊन मत मागत आहे.अशात सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे.
#WATCH | Lucknow, UP: Delhi CM Arvind Kejriwal says “Today, in Lucknow I have come to request the voters of UP to vote for the INDIA alliance. I want to talk about four issues. First, in this election PM Modi is asking for votes for Amit Shah, to make him the PM. Second, If BJP… pic.twitter.com/OcGHu6LTCx
— ANI (@ANI) May 16, 2024
दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लखनऊमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी अमित शहांसाठी मते मागत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.
अरविंद केजरीवाल पुढे म्हणालेकी, ‘मी आज लखनऊमध्ये यूपीच्या मतदारांना इंडिया आघाडीला मतदान करण्याची विनंती करण्यासाठी आलो आहे. मला चार मुद्द्यांवर बोलायचे आहे. पहिला मुद्दा या निवडणुकीत पंतप्रधान मोदी अमित शहांसाठी मते मागत आहे. अमित शाह यांना पीएम करण्यासाठी ते रोड शो करत आहे. दुसरे म्हणजे, भाजप सत्तेत आल्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना २-३ महिन्यांत त्यांच्या पदावरून हटवले जाईल. तिसरा मुद्दा सांगतांना ते म्हणाले, ‘मोदी सरकार सत्तेत आल्यास संविधान बदलतील आणि एससी, एसटीचे आरक्षण बदलतील.’ मात्र देशाची जनता येत्या 4 जून रोजी इंडिया आघाडी सत्तेवर आणणार आहे.’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यापूर्वी केजरीवाल म्हणाले होते की, ‘मोदींनीच भाजपमध्ये निवृत्तीचे वय 75 इतके निश्चित केले आहे. त्यानुसार त्यांनी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह, सुमित्रा महाजन अशा ज्येष्ठांना निवृत्त केले. पुढच्या वर्षी मोदींची 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे मोदींच्याच नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावे लागणार आहेत, मग मोदी कोणासाठी मते मागत आहेत आणि त्यांनी दिलेल्या गॅरंटी कोण पूर्ण करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.