करोनाबळींच्या संख्येत फ्रान्स बनला चौथा दसहजारी देश

जगभरात 83 हजारांहून अधिक मृत्यू
पॅरिस : करोनाने फ्रान्समध्ये घेतलेल्या बळींनी 10 हजारांची संख्या ओलांडली. त्यामुळे करोनाबळींच्या संख्येत फ्रान्स हा जगातील चौथा दसहजारी देश बनला. दरम्यान, त्या विषाणूने आतापर्यंत जगभरात 83 हजारांहून अधिक रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत.

जगभरात करोनाची बाधा झालेल्यांचा आकडा 15 लाखांच्या दिशेने कूच करत आहे. त्यातील निम्मे बाधित एकट्या युरोप खंडातील आहेत. युरोपमधील मृतांचे प्रमाण जगभराच्या तीन-चतुर्थांश इतके आहे. जगातील सर्वांधिक करोनाबळींची नोंद इटलीमध्ये झाली आहे. त्या देशात 17 हजारांहून अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत. त्याखालोखाल स्पेनमधील बळींनी 14 हजारांचा आकडा पार केला आहे. करोनाबाधितांचा विचार करता अमेरिकेतील संख्या जगात सर्वांत जास्त आहे. अमेरिकेत 4 लाखांहून अधिक जणांचा करोनाची लागण झाली आहे. त्या देशातील मृतांचा आकडा 13 हजारांजवळ जाऊन ठेपला आहे. ब्रिटनमध्ये 6 हजारांहून अधिक रूग्ण दगावले आहेत. इराणमधील मृतांचा आकडा 4 हजारांजवळ जाऊन ठेपला आहे.

मागील वर्षीच्या अखेरीस चीनमध्ये सर्वप्रथम करोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे चीनमध्ये हाहाकार उडाला. मात्र, त्या विषाणूचा फैलाव रोखण्यात त्या देशाला बऱ्याच प्रमाणात यश आले आहे. चीनमध्ये आतापर्यंत 3 हजार 333 जण मृत्युमुखी पडले आहेत. मात्र, त्या देशाला दिलासा देणाऱ्या करोनाचा जगभरात वेगाने फैलाव झाला आहे. जगातील 209 देश आणि प्रदेशांना करोनाने विळखा घातला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला त्या विषाणूवर मात करण्यासाठी झुंजावे लागत आहे. त्यातूनही 3 लाखांहून अधिक रूग्ण करोनामुक्त होण्याची बाब जगासाठी दिलासादायक ठरत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.