नवी दिल्ली – फ्रान्समध्ये शेतकर्यांकडून पॅरिसला घेराओ राजधानी पॅरिसला शेतकर्यांच्या ट्रॅक्टरने वेढा गातला आहे. यामुळे पपॅरिसकडे जाणार् या महामार्गांवरील वाहूतक संथ गतीने मार्गस्थ होते आहे. शेतकर् यांना दिल्या जाणार् या सवलतींचे प्रमाण वाढवण्यासाठी शेतकर् यांनी गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू केले असून आता राजधानी पॅरिसची नाकाबंदी करण्याच्या दृष्टीने शेतकर् यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
सहा महिन्यांत उन्हाळी ऑलिम्पिकचे आयोजन पॅरिसमद्ये केले जाणार आहे. मात्र यजमान पॅरिसच्या आसपासच्या प्रमुख मार्गांची नाकेबंदी आणि फ्रान्समधील इतरत्र निदर्शने यामुळे नवीन पंतप्रधान गॅब्रिएल अट्टल यांना आपल्या कार्यकालाच्या एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत आणखी एक कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते आहे. पंतप्रधान अट्टल यांनी गेल्या आठवड्यात शेतकर् यांना काही सुविधा आणि सवलती जाहीर केल्या आहेत.
मात्र त्या पुरेसा नाहीत, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. अन्न उत्पादन अधिक किफायतशीर, सोपे आणि न्याय्य असावे., ही आंदोलक शेतकर् यांची प्रमुख मागणी आहे. महामार्गांवर ट्रॅक्टर आणि ट्रक उभे करून शेतकर् यांनी वाहतूकीची कोंडी करायला सुरुवात केली आहे. काही आंदोलक अन्न आणि पाण्याचा साठा आणि तंबू घेऊन आले आहेत.
आंदोलकांनी राजधानीत प्रवेश करण्याचा कोणताही प्रयत्न रोखण्यासाठी सरकारने १५ हजार पोलीस तैनात केले आहेत. पॅरिसच्या आजूबाजूच्या प्रदेशात. पोलीस अधिकारी आणि चिलखती वाहने देखील आणली गेली आहेत.