बेळगाव – करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ऐन परीक्षा काळातच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परिणामी 2019-2020 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षाच झाल्या नाहीत. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करुन कर्नाटक राज्य शिक्षण मंडळाने इ. 7 वी ते इ. 9वी च्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले असून, एसएसएलसी परीक्षचे वेळापत्रक 14 एपिल नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचा आदेश बजाविण्यात आला आहे.
वर्स 2019-2020 या शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षेच्या काळातच कोरोनामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. परिणामी इ. 1 ली ते 6 वी च्या परीक्षा देखील अपूर्णच राहिल्या. सदर इयत्तेच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करुन पुढील शैक्षिाrणक वर्षात नवीन इयत्तेत प्रवेश देण्यात यावा असे जाहीर करण्यात आले. मात्र इ. 7 वी ची बोर्डांची परीक्षा व इ. 8 वी व 9 वी परीक्षेबाबत निर्णय प्रलंबित होता. आता कर्नाटक राज्य शिक्षण मंडळाचे शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी इ. 7 वी ते 9 वीची परीक्षा घेण्यात येणार नसून दहावी परीक्षेची तारीख लॉकडाऊन उठताच तात्काळ कळविण्यात येईल असे जाहीर केले आहे.
यामुळे इ. 7 वी ते 9 वीची परीक्षा होणार की नाही संभ्रमावस्थेत असणाऱया विद्यार्थी पालकांना दिलासा मिळाला आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने दिशा मिळाली आहे.