#IPL2021 : यंदाही आयपीएल हंगाम विनाप्रेक्षकच

नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगणार अंतिम सामना

नवी दिल्ली – आयपीएलचा चौदावा हंगाम सुरू होण्यास महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने नुकतेच आयपीएलच्या आगामी हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. 9 एप्रिल ते 30 मेदरम्यान ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग खेळली जाईल. मात्र, यंदाही स्पर्धा विनाप्रेक्षकच पार पडणार आहे. परंतु अखेरच्या टप्प्यात करोनाचा संसर्ग कमी झाल्यास निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. विशेष म्हणजे, यावर्षी कोणताही संघ आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळणार नाही.

कोविड-19 या साथीच्या पार्श्‍वभूमीवर बीसीसीआयने मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, दिल्ली आणि अहमदाबाद या सहा शहरांमध्ये आयपीएल सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांत महाराष्ट्रात करोनाबाधितांच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने मुंबईमध्ये आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन होणार का नाही? याबाबत साशंकता होती. मात्र, आता राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर मुंबईत सामने खेळवले जाणार आहेत.

चेन्नईत उद्‌घाटनाचा सामना खेळवला जाईल. तब्बल पाच वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा मुकाबला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर प्ले ऑफ आणि 30 मे 2021 रोजी अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने बीसीसीआयने आयपीएलसाठी सहा स्टेडियम्सची निवड केली आहे. यामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा समावेश आहे. आयपीएल 2021 मध्ये आठ संघ असतील. प्रत्येक संघ चार स्टेडियमवर सामने खेळेल. एकूण 56 सामने खेळवण्यात येतील. चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरूत प्रत्येकी 10 सामने रंगतील. तर अहमदाबाद आणि दिल्लीत प्रत्येकी 8 सामने होतील.

यंदाच्या आयपीएलमध्ये होम ग्राऊंड नसेल. म्हणजेच कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर सामने खेळायला मिळणार नाहीत. सर्व संघांचे सामने त्रयस्थ ठिकाणी होतील. प्रत्येक संघाला 6 स्टेडियमपैकी 4 स्टेडियम्सवर खेळण्याची संधी मिळेल. या पर्वात एकूण 11 डबल हेडर मॅच खेळवण्यात येणार आहेत. डबल हेडर म्हणजेच एकाच दिवसात 2 सामने. साधारणपणे हे डबल हेडर सामने शनिवार आणि रविवारी खेळवण्यात येतात.

डबल हेडरमधील पहिल्या सामन्याला दुपारी 3.30 वाजता, तर दिवसातील दुसऱ्या सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी नुकतेच आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यामध्ये मैदानात प्रेक्षक येणार नाहीत. यावर्षीदेखील आयपीएलचा हंगाम विनाप्रेक्षक खेळविण्यात येईल. सुरुवातीच्या काळात प्रेक्षक मैदानावर येणार नाहीत. मात्र, करोना या आजाराचा प्रभाव कमी झाल्यास स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी दिली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

संपूर्ण वेळापत्रक  (दिनांक, सामने, ठिकाण,वेळ)

9 एप्रिल मुंबई वि. बंगळुरू,  चेन्नई सा. 7.30
10 एप्रिल चेन्नई वि. दिल्ली, मुंबई सा. 7.30
11 एप्रिल हैदराबाद वि. कोलकाता, चेन्नई सा. 7.30
12 एप्रिल राजस्थान वि. पंजाब, मुंबई सा. 7.30
13 एप्रिल कोलकाता वि. मुंबई, चेन्नई सा. 7.30
14 एप्रिल हैदराबाद वि. बंगळुरू, चेन्नई सा. 7.30
15 एप्रिल राजस्थान वि. दिल्ली, मुंबई सा. 7.30
16 एप्रिल पंजाब वि. चेन्नई, मुंबई सा. 7.30
17 एप्रिल मुंबई वि. हैदराबाद, चेन्नई सा. 7.30
18 एप्रिल बंगळरू वि. कोलकाता, चेन्नई दु. 3.30
18 एप्रिल दिल्ली वि. पंजाब, मुंबई सा. 7.30
19 एप्रिल चेन्नई वि. राजस्थान, मुंबई सा. 7.30
20 एप्रिलदिल्ली वि. मुंबई, चेन्नई सा. 7.30
21 एप्रिल पंजाब वि. हैदराबाद, चेन्नई दु. 3.30
21 एप्रिल कोलकाता वि. चेन्नई, मुंबई सा. 7.30
22 एप्रिल बंगळुरू वि. राजस्थान, मुंबई सा. 7.30
23 एप्रिल पंजाब वि. मुंबई, चेन्नई सा. 7.30
24 एप्रिल राजस्थान वि. कोलकाता, मुंबई सा. 7.30
25 एप्रिल चेन्नई वि. बंगळुरू, मुंबई दु. 3.30
25 एप्रिल हैदराबाद वि. दिल्ली, चेन्नई सा. 7.30
26 एप्रिल पंजाब वि. कोलकाता, अहमदाबाद सा. 7.30
27 एप्रिल दिल्ली वि. बंगळुरू, अहमदाबाद सा. 7.30
28 एप्रिल चेन्नई वि. हैदराबाद, दिल्ली सा. 7.30
29 एप्रिल मुंबई वि. राजस्थान, दिल्ली सा. 7.30
29 एप्रिल दिल्ली वि. कोलकाता, अहमदाबाद सा. 7.30
30 एप्रिल पंजाब वि. बंगळुरू, अहमदाबाद सा. 7.30
1 मे मुंबई वि. चेन्नई, दिल्ली सा. 7.30
2 मे पंजाब वि. दिल्लीअहमदाबाद सा. 7.30
3 मे कोलकाता वि. बंगळुरू, अहमदाबाद सा. 7.30
4 मे हैदराबाद वि. मुंबई, दिल्ली सा. 7.30
5 मे राजस्थान वि. चेन्नई, दिल्ली सा. 7.30
6 मे बंगळुरू वि. पंजाब, अहमदाबाद सा. 7.30
7 मे हैदराबाद वि. चेन्नई, दिल्ली सा. 7.30
8 मे कोलकाता वि. दिल्ली, अहमदाबाद दु. 3.30
8 मे राजस्थान वि. मुंबई, दिल्ली सा. 7.30
9 मेचेन्नई वि. पंजाब, बंगळुरू दु. 3.30
9 मे बंगळुरू वि. हैदराबाद, कोलकाता सा. 7.30
10 मे मुंबई वि. कोलकाता, बंगळुरू सा. 7.30
11 मे दिल्ली वि. राजस्थान, कोलकाता सा. 7.30
12 मे चेन्नई वि. कोलकाता, बंगळुरू सा. 7.30
13 मेमुंबई वि. पंजाब, बंगळुरू दु. 3.30
13 मे हैदराबाद वि. राजस्थान, कोलकाता सा. 7.30
14 मे बंगळुरू वि. दिल्ली, कोलकाता सा. 7.30
15 मे कोलकाता वि. पंजाब, बंगळुरू सा. 7.30
16 मे राजस्थान वि. बंगळुरू, कोलकाता दु. 3.30
16 मे चेन्नई वि. मुंबई, बंगळुरू सा. 7.30
17 मे दिल्ली वि. हैदराबाद, कोलकाता सा. 7.30
18 मे कोलकाता वि. राजस्थान, बंगळुरू सा. 7.30
19 मे हैदराबाद वि. पंजाब, बंगळुरू सा. 7.30
20 मे बंगळुरू वि. मुंबई, कोलकाता सा. 7.30
21 मे कोलकाता वि. हैदराबाद, बंगळुरू दु. 3.30
21 मे दिल्ली वि. चेन्नई, कोलकाता सा. 7.30
22 मे पंजाब वि. राजस्थान,बंगळुरू सा. 7.30
23 मे मुंबई वि. दिल्ली,कोलकाता दु. 3.30
23 मे बंगळुरू वि. चेन्नई ,कोलकाता सा. 7.30

प्लेऑफ

25 मे ,क्वॉलिफायर 1,अहमदाबाद,सा. 7.30
26 मे, एलिमिनेटर, अहमदाबाद, सा. 7.30
28 मे, क्वॉलिफायर 2, अहमदाबाद, सा. 7.30

असे होणार सामने

बीसीसीआयने जाहीर केल्याप्रमाणे आयपीएलचे सर्व सामने सहा शहरांमध्ये खेळविले जातील. चेन्नई, बंगळुरू, कोलकाता व मुंबई येथे प्रत्येकी 10 तर दिल्ली व अहमदाबाद प्रत्येकी आठ सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. प्ले ऑफचे सर्व सामने सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विशेष म्हणजे, यावर्षी कोणताही संघ आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.