मुंबई – लॉकडाउन जाहीर झाल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी दिवस-रात्र कर्तव्य बजावित आहेत. पण करोनाशी लढणाऱ्या खाकी वर्दीतील अनेक योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात शनिवारी एकाच दिवशी मुंबईत आणखी चार पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
बोरिवली, वाकोला आणि दिंडोशी या पोलीस ठाण्यांमध्ये हे कर्मचारी तैनात होते. मुंबईत आतापर्यंत 26 पोलीस कर्मचाऱ्यांनी करोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
राज्यात मागील दोन दिवसांत 129 पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या 3 हजार 388 इतकी झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात 40 पोलिसांचा करोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. तर 3 हजार 388 पैकी आत्तापर्यंत 1945 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.