दौंड -दौंड शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणांसह एका ज्येष्ठेला करोनाची बाधा झाली आहे. यात 13 ते 17 वयोगटातील पाच मुलांसह एका 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा करोना अहवाल शनिवारी (दि. 13) पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती दौंडचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
शहरात सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 23 जणांची करोना तपासणी करण्यात आली होती त्यातील 22 जणांचे वैद्यकीय अहवाल शनिवारी मिळाले, त्यातील 6 पॉझिटिव्ह तर 16 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.