पूर्व सिंगभूम (झारखंड) – झारखंडच्या पूर्व सिंगभूममधील गमहरिया रेल्वे स्थानकाजवळ कलिंग उत्कल एक्सप्रेसने दिलेल्या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.
ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या मृतांमध्ये एका महिलेसह चौघांचा समावेश आहे. यातील दोन जणांची ओळख पटली असून अद्याप दोघांची ओळख पटलेली नाही.
याबाबत टाटानगर जंक्शनचे अधीक्षक अभिषेक सिंघल यांनी सांगितले की, हा अपघात मृत व्यक्ती हे फूट ओव्हर ब्रिजचा वापर न करता ट्रॅक ओलांडत असताना घडला. या अपघातात मृतदेह खुपच खराब अवस्थेत आढळले आहेत. यात एक मृतदेह महिलेचा असून अद्याप सर्वांची ओळख पटलेली नाही.