शिरूर-कारेगाव परिसरात आलिशान स्विफ्ट डिझायर गाडीतून मटका जुगार खेळणाऱ्या चार जणांना मुद्देमालासह रांजणगाव गणपतीचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या पथकाने छापा टाकून पकडले आहे. ही कारवाई तीन जून सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास झाली आहे.
मनोहर जयराम पिडगे (वय 35), दिगंबर रमाकांत वडघुले (वय 43), शंकर जगन्नाथ आढाव (वय 34), सचिन जगन्नाथ सातपुते (वय 35, सर्व रा. कारेगाव, ता. शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.