नगर -जिल्ह्यात आढळून आलेले डेल्टाप्लसचे चार रुग्ण जुने असून, आता ते ठणठणीत आहेत. करोना उपचार सुरू असताना जुले महिन्यात तपासणी पाठविण्यात आलेल्या नमुण्यांपैकी चौघांचे सॅम्पल डेल्टाप्लस असल्याचे अहवाल प्राप्त झाले होते. सध्या ते रुग्ण पूर्णपणे बरे झालेले असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडे चार रुग्णाचे डेल्टाप्लस अहवाल प्राप्त झाले आहेत. ते रुग्ण जुलै महिन्यात करोना बाधित झाले होते. त्याचे घशातील नमुणे 16, 17, 20 व 21 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयाने जनुकाय तपासणीसाठी पाठविले होते. जिल्हा रुग्णालयातून 15 टक्के रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुणे अशा पद्धतीने जणुकीय तपासणीसाठी पाठविले जाते. जुलै महिन्यात पाठविलेल्या नमुण्यामधून चार जणांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले होते. त्यात पारनेर तालुक्यातील दोघे व पाथर्डी, श्रीगोंदे तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
डेल्टाप्लसचे अहवाल नवे असले तरी रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेलेले असून, नगारिकांनी घाबरून जाऊ नये. 15 टक्के करोना रुग्णांचे नमुणे जणुकीय तपासणीसाठी पाठविणे ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याचे अहवालामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन सांगळे यांनी केले आहे.