मुंबई – भारताचा लेग स्पिन गोलंदाज यजुवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) याने ऑस्ट्रेलियाचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अँड्य्रू सायमंड व न्यूझीलंडचा माजी कसोटीपटू जेम्स फ्रॅंकलीन यांनी छळ केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी आता फ्रॅंकलिनची चौकशी होणार आहे. फ्रॅंकलिन सध्या डरहॅम कौंटी क्रिकेट क्लबचा मुख्य प्रशिक्षक आहे.
सायमंड आणि फ्रॅंकलिन यांनी दारूच्या नशेत त्याला रूममध्ये हात व पाय बांधून कोंडून ठेवले होते तसेच अन्य एका खेळाडूने 2013 साली पंधराव्या मजल्यावर लटकवून ठेवल्याचा गौप्यस्फोट चहलने केला होता.
फ्रॅंकलिन 2011 ते 2013 सालापर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. दरम्यान, चहल मुंबई इंडियन्समध्ये असताना 2013 सालीही एक घटना झाली होती. त्यावेळी एका खेळाडूने दारूच्या नशेत चहलला 15 व्या मजल्यावरून खाली लटकवले होते असे आरोपही चहलने केले होते.