Yuzvendra Chahal, IPL 2024 : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात युझवेंद्र चहलने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 200 बळी पूर्ण केले. एमआय विरुद्ध आरआर सामना सुरू होण्यापूर्वी, चहलने 152 सामन्यांमध्ये 199 विकेट घेतल्या होत्या आणि इतिहास रचण्यासाठी त्याला फक्त 1 बळी घेण्याची गरज होती.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद नबीला बाद करत चहलने कारकिर्दीतील 200 बळी पूर्ण केले. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा चहल हा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक विकेट घेणारा ड्वेन ब्राव्हो आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत 183 विकेट्स घेतल्या आहेत.
युझवेंद्र चहलने 2013 साली इंडियन प्रीमियर लीगमध्ये पहिला सामना खेळला होता आणि गेल्या 12 वर्षांत तो 3 संघांकडून खेळला आहे. चहलने 2013 मध्ये मुंबई इंडियन्सकडून फक्त 1 सामना खेळला, ज्यामध्ये तो एकही विकेट घेऊ शकला नाही. त्यानंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची 8 हंगाम सेवा केली. युजवेंद्र चहलने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी 113 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 139 विकेट घेतल्या. 2022 मध्ये लेगस्पिन जादूगार चहलने राजस्थान रॉयल्समध्ये प्रवेश केला. चहलने आतापर्यंत आरआरसाठी 39 सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या फिरकी चेंडूने 61 बळी घेतले आहेत.
IPL 2024 : दाम कमी पण काम मोठे..! अवघ्या 20 लाखांत ‘हे’ खेळाडू करतायेत करोडोंची कामगिरी…
पर्पल कॅपचा विजेता देखील राहिला आहे चहल…
युझवेंद्र चहल हा आयपीएलमध्ये पर्पल कॅपचा विजेताही ठरला आहे. 2022 मध्ये तो पहिल्यांदा राजस्थान रॉयल्सकडून खेळला आणि त्याच मोसमात त्याने 27 विकेट घेत पर्पल कॅप जिंकली. चहल हा देखील असा गोलंदाज आहे ज्याने 5 वेगवेगळ्या हंगामात 20 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. आपल्या कारकिर्दीतील 200 वी विकेट घेण्यापर्यंत, चहल आयपीएल 2024 मध्ये पर्पल कॅपच्या शर्यतीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. चालू मोसमात त्याने आतापर्यंत 13 विकेट्स घेतल्या आहेत.