मेरठ :- आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रवीण कुमार यांच्या कारला मंगळवारी रात्री उशिरा आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. यामध्ये प्रवीणकुमार थोडक्यात बचावला.
माहिती मिळताच सीओ सिव्हिल लाईन अरविंद चौरसिया पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. आरोपी कंटेनर चालक जागीच पकडला गेला आहे.
बागपत रोडवरील मुलतान नगरचा रहिवासी असलेला क्रिकेटर प्रवीण कुमार मंगळवारी रात्री 10 वाजता त्याच्या डिफेन्डर वाहनाने पांडव नगरहून येत होता. सोबत त्याचा मुलगाही होता. ते आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ पोहोचताच समोरून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने त्यांच्या कारला धडक दिली. यामध्ये वाहनाचे नुकसान झाले, तर प्रवीण कुमार आणि त्यांचा मुलगा सुखरूप बचावले. अपघातानंतर तेथे लोकांचा जमाव जमला, त्यांनी कॅंटर चालकाला जागीच पकडले.
“अपघातात प्रवीण कुमार आणि त्यांचा मुलगा सुरक्षित आहेत. कंटेनर चालकाची चौकशी करण्यात येत आहे,’ असे सीओ अरविंद चौरसियाही यांनी यावेळी म्हटले आहे.
भारताचा स्टार गोलंदाज प्रवीण कुमार प्रवीण कुमारने 2007 मध्ये भारताकडून पदार्पण केले. त्याने टीम इंडियासाठी सहा कसोटी, 68 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळले. 2008 मध्ये, प्रवीणने ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या कॉमनवेल्थ बॅंक मालिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
कसोटीत 27, एकदिवसीय सामन्यात 77 आणि टी-20 मध्ये आठ विकेट्स घेतल्या आहेत. प्रवीणने टीम इंडियासाठी शेवटचा सामना 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्याने 119 आयपीएल सामने खेळले असून 90 विकेट्स घेतल्या आहेत.