चेन्नाई – महिला न्यायाधिशांच्या विरोधात तसेच हायकोर्ट आणि सुुप्रिम कोर्टाच्या न्यायाधिशांच्या पत्नींच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल हायकोर्टाचे माजी न्यायाधिश सी. एस. कर्नान यांना आज चेन्नाई पोलिसांनी अटक केली आहे.
कर्नान यांनीही ही विधाने व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ती स्वताच यु ट्युबवर टाकली होती. त्यावरून मोठाच गहजब उडाल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी आज अटकेची कारवाई केली. कर्नान यांच्यावर कारवाई न केल्याबद्दल मद्रास हायकोर्टाने पोलिसांवर जोरदार ताशेरे मारले होते.
त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कर्नान हे वादग्रस्त व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांच्यावर बेताल वक्तव्याचे अन्यही आरोप आहेत. या आरोपांबाबत त्यांनी कोणतीही दिलगीरी व्यक्त केलेली नाही.