फ्रान्सचे माजी अध्यक्ष सारकोझी यांना 1 वर्षाची शिक्षा

पॅरिस – फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सारकोझी यांना फ्रान्समधील न्यायालयाने भ्रष्टाचार आणि तपासात हस्तक्षेप करण्याच्या आरोपात दोषी ठरवून एकूण तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेतील दोन वर्षांची शिक्षा यापूर्वीच भोगलेली असल्याने आता त्यांना एक वर्षाची शिक्षाच भोगायला लागणार आहे. मात्र फ्रान्समधील कायद्यानुसार दोन वर्षांची शिक्षा असल्यासच प्रत्यक्ष तुरुंगात रवानगी होऊ शकते. त्यामुळे आता त्यांना प्रत्यक्ष तुरुंगात पाठवले जाण्याची शक्‍यता कमी आहे. त्या ऐवजी यांना घरीच नजरकैदेत ठेवले जाऊ शकते. या काळात पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या मनगटावर इलेक्‍ट्रॉनिक पट्टा बांधला जाऊ शकतो.

सारकोझी हे 2007 ते 2012 दरम्यान फ्रान्सचे अध्यक्ष होते. 2014 मध्ये वरिष्ठ न्यायाधीशाकडून आपल्या खटल्याबाबतची माहिती मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यांनी या न्यायाधीशांना मोनॅको मध्ये वरिष्ठ पदावरील नोकरी देण्याचे आमिषही दाखवले होते.

याशिवाय सरकोझी यांच्यावर अन्य 13 जणांसह आणखी एक खटला चालावला जाणार आहे. 2012 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणूकीतील प्रचारासाठी बेकायदेशीरपणे अर्थसहाय्य केल्याचा आरोप त्यांच्यावर असणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.