पुणे : अग्निशमन दलातील माजी अधिकारी व राष्ट्रपती शौर्य पदक विजेते तुकाराम शंकर भिलारे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे अग्निशमन दलातील अधिकारी विजय भिलारे यांच्यासह तीन मुले दोन मुली, पत्नी, जावयी, नातू असा परिवार आहे़. त्यांचा दशक्रिया विधी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता कात्रज स्मशानभूमी येथे होणार आहे.