पिंपरी – काम सांगितल्याचा राग आल्याने सोबत काम करणाऱ्या कामगाराला वस्तूने मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 9) रात्री साडेआठच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे घडली.
याप्रकरणी पंकज मधुकर आग्रे (वय 33, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड, पुणे) यांनी (दि. 11) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश बाबुराव साने (वय 35, रा. रोशन गार्डन मागे, भोसरी) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी पंकज आणि आरोपी गणेश हे रविवारी दोघे एका मशीनवर काम करीत असताना पंकज यांने गणेश याला काम सांगितले. त्यामुळे गणेशने त्याच्या डोक्यात ब्रासच्या जॉबने मारहाण केली.