ढाका – बांगलादेशचा माजी ऑफस्पिन गोलंदाज मुशर्रफ हुसेन रुबेल याचे नुकतेच निधन झाले. तो 40 वर्षांचा होता. त्याला ब्रेन ट्युमर झाला होता व गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.
हुसेनने 2008 ते 2016 सालापर्यंत बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. त्याने आपल्या कारकिर्दीत 56 टी-20 सामन्यात 60 बळी घेतले आहेत. हुसेनने बांगलादेशकडून पाच एकदिवसीय सामने खेळले असून 4 बळी घेतले आहेत.
मार्च 2019 मध्ये त्याला ब्रेन ट्यूमर झाल्याचे निदान झाले, तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्यावर गेल्या तीन वर्षांपासून भारत, सिंगापूर येथेही उपचार करण्यात आले होते.