मुंबई – येत्या 3 मेपर्यंत मशीदींवरील भोंगे हटवा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. राज्यातील काही मौलवी आणि धर्मगुरूंनी भोंगे हटवणार नाही अशी भूमिका घेतली होती. परंतु मुंबईत याचा परिणाम दिसत आहे. अनेक मशीदींवरील भोंगे हटवले असून अनेक ठिकाणी भोंग्यांचा आवाज कमी झाला आहे. नाशिक पोलिसांनीही बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवण्याचे आदेश दिले असून मशींदीसमोर हनुमान चालीसा लावण्यावर बंदी घातली आहे. राज्यात धार्मिक स्थळी लाऊडस्पीकर लावण्यावरून राज्य सरकारही लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे.
ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांनी मेपर्यंत अल्टिमेटम दिला होता. मुस्लि समाजाला त्यांनी आवाहन केले होते राज्य सरकारला याबद्दल अल्टिमेटम दिले होते. मुंबईत याचा परिणाम दिसून येत आहे. मुंबईतील 70 टक्के मशीदींनी आपले भोंगे उतरवले आहेत. तसेच अनेक मशीदींनी आपल्या भोंग्यांचा आवाज कमी केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या मार्गदर्शक तत्वांकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबई पोलिसांनी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंग्यांना अगोदरच मनाई केली आहे.