देऊळगाव पासून अवघ्या पा किमीवर असलेल्या अजनुजमधील घटना
देऊळगाव राजे : आजपर्यंत पाळीव प्राणी, कुत्रे यावर हल्ला करणारा बिबट्या आता माणसांवर हल्ला करू लागला आहे. देऊळगावराजेपासून अवघ्या पाच किलोमीटरवर असणार्या अजनुज (ता. श्रीगोंदा, जि. नगर) गावात शुक्रवारी (दि. 19) रात्री ऊसतोडणी मजुराच्या एका तीन वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
लक्ष्मी अरुण गायकवाड (पाटोदा, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
अंबालिका कारखान्याच्या मजुराच्या टोळीतील ही चिमुकली कोपीच्या बाहेर खेळत होती तिची आई कोपित स्वयंपाक करत असताना बिबट्याने अचानक लक्ष्मीवर बिबट्याने हल्ला केला आणि उचलून नेले आईने आरडा ओरडा केल्यावर जवळच असणार्या हॉटेलमधील लोक बाहेर पळाले बॅटरी लावल्यावर मुलीला बिबट्या घेऊन जात असल्याचे लक्षात आले.
ग्रामस्थांनी आरडा ओरडा केल्यावर पूर्ण गावच जमा झाले बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच हाती लागले नाही शेवटी काटवणाच्या शेतात पाहिले असता मुलगी जखमी अवस्थेत पडलेली दिसली. तिच्या मानेवर व गळ्यावर दातांच्या खुणा होत्या ती जखमी असेल असे लोकांना वाटले व गावातील डॉ. अजित काकडे यांच्या रुग्णालयात नेण्यात आली पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
आजपर्यंत देऊळगाव राजे आणि परिसरातील वारंवार नजरेस पडणारा बिबट्या आणि पाळीव प्राण्यांवर हल्ला करणारा आता मानवावर हल्ला करू लागल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. शेतात काम करणारे शेतमजूर आपला जीव मुठीत धरून शेतातील कामे करत आहेत. वन विभागाला वारंवार सांगून देखील कुठलीही ठोस भूमिका त्यांच्याकडून घेतली जात नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल.