वाकोडी फाटा येथील घटना : भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
नगर – नगर तालुक्यातील वाकोडी फाटा येथे अंगावर थुंकल्याची विचारणा केल्याचा रागातून चार जणांनी युवकास लोखंडी फायटर, दगड, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत पाच हजार रुपयांची रोकड गहाळ झाली.असल्याची फिर्याद भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
कृष्णा साठे, सोंड्या नवगिरे, अरुण थोरात, राकेश (पूर्ण नावे माहीत नाहीत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत प्रकाश दशरथ भिंगारदिवे (रा. सोलापूर रोड, केदार वस्ती, नगर) हे जखमी झाले आहेत. कृष्णा साठे हा प्रकाश भिंगारदिवे यांच्या अंगावर थुंकला. भिंगारदिवे यांनी थुंकल्याची विचारणार केली. त्यामुळ रागाविलेल्या कृष्णा साठे व त्याच्या साथीदारांनी लोखंडी फायटर, दगड व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
तसेच चाकूने जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी झालेल्या झटापटीत भिंगारदिवे यांच्या खिशातील पाच हजार रुपयांची रोकड काढली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात प्रकाश भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गायकवाड हे करीत आहेत. शहरात मारहाणीच्या घटना वाढतच असून पोलीस प्रशासनाने ही लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.