पुणे : करोना संकटातून शहरातील बांधकाम व्यवसाय सावरत असल्याने शहरात नवीन बांधकामांची संख्या लक्षणीय वाढली आहे. परिणामी, महापालिकेच्या बांधकाम विभागाने सलग दुसऱ्या वर्षी अंदाजपत्रकात दिलेले उद्दिष्ठ गाठण्याची कामगिरी केली आहे.
दरम्यान, 2022-23 या आर्थिक वर्षासाठी महापालिका आयुक्तांच्या अंदाजपत्रकात बांधकाम विभागास 1400 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. तर या विभागाला तब्बल 1540 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. तर 2021-22 या आर्थिक वर्षात या विभागास 999 कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले होते. तर शासनाने करोना संकटानंतर प्रिमियम शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे पालिकेस तब्बल 2 हजार कोटींचा महसूल मिळाला होता.
गेल्या काही वर्षात बांधकाम व्यावसायात मंदीचे वातावरण असल्याने महापालिकेच्या बांधकाम शुल्काच्या उत्पन्नाला त्याचा फटका बसला होता. त्यानंतर हळू हळू हे वातावरण सावरत असतानाच पुन्हा दोन वर्षे करोना संकटात गेल्यामुळे महापालिकेचे उत्पन्नही लक्षणीय घटले होते.
असा वाढत गेला महसूल…
वर्ष उद्दीष्ट प्रत्यक्ष मिळालेले उत्पन्न
2018-19………..815 कोटी……. 615 कोटी
2019-20………..900 कोटी ……..770 कोटी
2020-21………..999 कोटी ………508 कोटी
2021-22………..1185 कोटी………2095 कोटी
2022-23…………1400 कोटी………1540 कोटी
त्यानंतर गेल्या दोन वर्षात शासनाकडून वेळोवेळी या क्षेत्रासाठी घेण्यात आलेले सकारात्मक निर्णय तसेच महापालिकेकडून सुलभ करण्यात येत असलेली बांधकाम प्रक्रीयेसह बांधकाम क्षेत्रातून हटत असलेले मंदीचे सावट या मुळे यंदाही महापालिकेस बांधकाम शुल्कातून उद्दीष्टापेक्षा अधिक उत्पन्न मिळाले असल्याचे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.