मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज त्यांच्या निवासस्थानी (सिल्व्हर ओक) शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री उदय सामंत यांनी आमदार भरत गोगावलेंसह सदिच्छा भेट घेतली आहे. याबदल ट्विट करत मंत्री उद्य सामंत यांनी माहिती दिली आहे.
मंत्री सामंत यांनी या भेटीचे फोटो पोस्ट करत ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले असले तरी भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या भेटीनंतर राजकीय चर्चेनां उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची आज त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आ. भरतशेठ गोगावले, डॉ. प्रा. प्रदीप ढवळ उपस्थित होते pic.twitter.com/6eZi2Cwo55
— Uday Samant (@samant_uday) March 31, 2023
मंत्री उदय सामंत यांनी ट्विटर फोटो पोस्ट करताना म्हटले आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची आज त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आ. भरतशेठ गोगावले, डॉ. प्रा. प्रदीप ढवळ उपस्थित होते.”