जोहान्सबर्ग – भारत दौरा तसेच ऑस्ट्रेलियात आगामी काळात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने आपला संघ जाहीर केला. मात्र, धडाकेबाज फलंदाज रुसी वॅन दर दुसेन याला आश्चर्यकारकपणे वगळण्यात आले आहे.
15 खेळाडूंच्या संघाचे कर्णधारपद टेम्बा बवुमाकडे सोपवण्यात आले असून हाच संघ या महिन्याच्या अखेरीस तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहे. बावुमा जूनमध्ये भारताविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरला आहे.
सलग दुसऱ्यांदा तो टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर रिले रुसोने यानेही टी-20 संघात पुनरागमन केले आहे.
दक्षिण आफ्रिका संघ – टेम्बा बवुमा (कर्णधार), क्वांटन डिकॉक, हेनरिक क्लासेन, रीजा हेंड्रिक्स, केशव महाराज, एडन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनजीडी, एनरिक नोर्जे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले रोसौव, तबरेज शम्सी.