दोहा – फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील लढतीत मेक्सिकोने सौदी अरेबियाचा 2-1 असा पराभव केला. (Mexico beat Saudi Arabia 2-1 but are eliminated from World Cup 2022) मात्र, या विजयानंतरही त्यांना बाद फेरी गाठता आला नाही. क गटातील या सामन्यात मेक्सिकोने 4 गुणांची कमाई केली असली तरीही एक नकारात्मक गुणाचा फटका बसल्याने त्यांचे यंदाच्या स्पर्धेतील अव्हान संपुष्टात आले आहे.
या सामन्यात पहिला हाफ दोन्ही संघांसाठी निराशाजनकच ठरला. दोन्ही संघांना एकमेकांचा बचाव भेदण्यात यश आले नाही. दुसरा हाफ सुरू झाल्यावर मेक्सिकोच्या हेनरी मार्टिनने 47 व्या मिनिटाला गोल केला व संघाला आघाडी प्राप्त करून दिली.
त्यानंतर पाचच मिनिटांनी म्हणजे 52 व्या मिनिटाला मेक्सिकोच्या लुइस शवेजने गोल केला व संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली. त्यानंतर त्यांनी बचावात्मक खेळावर भर दिला.
Russia Peace Plan : ‘झेलेन्सकी’कडून इलॉन मस्क यांची खरडपट्टी; म्हणाले “अगोदर युक्रेनला यावे आणि…”
सामना संपण्यापूर्वी भरपाई वेळेतील 5 व्या मिनिटाला मेक्सिकोचा बचाव भेदत सौदी अरेबियाच्या सालेम अल्दवासीरीने गोल केला व सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र, त्यानंतर सौदीला पुन्हा गोल करता आला नाही व याच फरकाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.