पुणे – गेल्या दोन वर्षांपासून दमदार कामगिरी करत असलेल्या अष्टपैलू शार्दूल ठाकूरवर यंदाच्या आयपीएल लिलावात पैशांचा पाऊस पडणार यात शंका नाही. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार शार्दुल ठाकूर 2015 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी पहिला आयपीएल सामना खेळला आणि त्यानंतर 2017 मध्ये तो रायझिंग पुणे सुपरजायंट्ससाठी खेळला. 2018 मध्ये, त्याला चेन्नई सुपर किंग्सने 2.5 कोटींमध्ये करारबद्ध केले होते आणि तो संघाचा अविभाज्य भाग होता. त्याच्या आयपीएलमधील कामगिरीमुळे त्याला भारतीय संघातही स्थान मिळाले आणि त्याचे योगदान मोलाचे ठरले आहे. तो आता अष्टपैलू खेळाडू म्हणून पुढे येत आहे.
टी20 क्रिकेटमध्ये गेम चेंजर्सची गरज असते आणि असाच एक खेळाडू म्हणजे शार्दुल ठाकूरने ओळख निर्माण केली आहे.. त्याच्याकडे बळी घेण्याची हातोटी आहे आणि तो निर्णायक वेळी महत्त्वाचे बळी घेतो. आणि म्हणूनच, यंदाच्या आयपीएल लिलावत सर्वच संघा त्याला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील.
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्सने त्यांचा कर्णधार रोहित शर्मा, गोलंदाज जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरॉन पोलार्ड यांना यंदाच्या हंगामासाठी संघात कायम ठेवले आहे. मुंबई यंदा काही स्थानिक खेळाडूंचा संघात समावेश करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे शार्दुल ठाकूरला संघात समाविष्ठ करण्याठी मुंबई निश्चितपणे प्रयत्न करेल. मुंबईची मदार भारतीय खेळाडूंवर राहिली आहे. जसप्रीत बुमराह किफायतशीर षटके टाकण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि जर शार्दुल संघात आला तर मुंबई त्याचा निर्णयाक क्षणी वापर करु शकेल. यासह शार्दूलची फलंदाजीही मुंबईसाठी जमेची बाजू ठरु शकते. लोकल बॉय असल्याने शार्दूलने वानखेडेवर बरेच सामने खेळले आहेत आणि शार्दूलच्या याच अनुभवाचा विचार करुन मुंबई त्याच्यावर मोठी बोली लावण्याच मागे पुढे पहाणार नाही.
चेन्नई सुपर किंग्ज
चेन्नई सुपर किंग्स असा संघ आहे जो त्यांच्या खेळाडूंशी खूप प्रमाणिक आहे, कारण ते नेहमी संघासाठी कामगिरी केलेल्या खेळाडूंना मदत करतात. महेंद्रसिंग धोनी हा एक असा कर्णधार आहे जो प्रत्ये खेळाडूकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करुन घेतो. आणि शार्दुलला देखील तयार करण्यात धोनीचा मोठा वाटा आहे. हा 30 वर्षीय शार्दूल मागील हंगामात चेन्नईसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. चेन्नईसाठी, तो 2018 पासून खेळत आहे आणि त्याने संघासाठी 55 बळी घेतले आहेत. धोनीला अष्टपैलू खेळाडूंनी संघ बांधायला आवडते आणि शार्दुल निश्चितपणे एक संभाव्य अष्टपैलू खेळाडू आहे. सीएसकेने आधीच अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांना कायम ठेवले आहे. त्यांना आता शार्दूलला परत मिळवून त्याच्या अष्टपैलू क्षमतेने संघ मजबूत करायचा आहे.
पंजाब किंग्ज
पंजाब किंग्स बर्याच काळापासून सामाधानकारक कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. यंदाच्या लिलावापूर्वी पंजाब किंग्सने मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंगला कायम ठेवले आहे. त्यांनी त्यांचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीला करारमुक्त केले आहे. त्यामुळे पंजाब वेगवान गोलंदाजीसह फलंदाजीतही उपयुक्त असलेल्या खेळाडूच्या शोधात आहे. विशेष म्हणजे पंजाबने 2018 मध्येही लिलावात खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना अपयश आले. यंदा, लिलावासाठी पंजाबकडे सर्वाधिक रक्कम शिल्लक असल्यामुळे, पंबाज शार्दूलला करारबद्ध करण्यासाठी कोणताही संकोच न ठेवता मोठी रक्कम खर्च करतील.