रोनाल्डोच्या विक्रमी गोलने जुवेंन्ट्‌सला विजेतेपद

Italian Super Cup : इटालियन सुपर कप फुटबॉल

मिलान – कारकिर्दीतील 760 वा गोल नोंदवताना ख्रिस्तियानो रोनाल्डोने जुवेंन्ट्‌स संघाला इटालियन सुपर कप ( Italian Super Cup ) फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. युरोपियन लीग फुटबॉल स्पर्धेत रोनाल्डोने हा विक्रम साकार केला.

त्याच्या कामगिरीच्या जोरावर जुवेंन्ट्‌सने नापोली संघावर 2-0 अशी सहज मात केली. त्यांचे या स्पर्धेच्या इतिहासातील हे नववे विजेतेपद ठरले. हा सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याचे केलेले सर्व प्रयत्न फोल ठरले.

दुसरा हाफ सुरू झाल्यावर मात्र, रोनाल्डोने 64 व्या मिनिटाला गोल केला व संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामन्याच्या अतिरिक्त वेळेत 95 व्या मिनिटाला अल्वारो मोराटाने गोल केला व संघाचा 2-0 असा विजय साकार केला.

या सामन्यातील गोलमुळे या स्तरावरील स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम रोनाल्डोने साकार केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.