बॅकॉक – भारताचा होतकरू बॅडमिंटनपटू समीर वर्मा याने धक्कादायक निकाल नोंदवताना थायलंड सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
त्याने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या रॅसमस गेमके याच्यावर केवळ 39 मिनिटांच्या खेळात 21-12, 21-9 अशी मात केली.
स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटातही भारतीय जोडीने यश मिळवले. सात्विकसाईराज रांकीरेड्डीने अश्विनी पोनाप्पासह खेळताना जर्मनीच्या मार्क लॅम्फुस व इसाबेल हेट्रीच जोडीचा 22-20, 14-21, 21-16 असा तीन गेममध्ये पराभव केला.
भारताच्या रांकीरेड्डीव पोनाप्पा जोडीनेही स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.