कोरेगाव भीमा – लॉकडाऊनमुळे औद्योगिक वसाहतीमधील मजुरांची उपासमार होऊ लागली आहे. त्यामुळे ओरिएन्टल रबर कंपनी व डीसीसीआयए कंपनीच्या वतीने 600 गरजू कुटुंबीयांना किराणा व फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले.
शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या सूचनेननुसार ओरिएन्टल रबर कंपनीचे राहुल वाबळे व डीसीसीआयए कंपनीचे सचिन वाघोडे यांच्या हस्ते तुळापूर फाटा व कोरेगाव भीमामध्ये किराणामालाचे वाटप करण्यात आले.
तसेच सेको टूल्स प्रा.लि. व ओरिएन्टलच्या वतीने गरजू 150 कुटुंबांना किरणाचे वाटप करण्यात आले. डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, उद्योग व कृषीचे उपाध्यक्ष हरी प्रकाश श्रीवास्तव म्हणाले की करोना ही राष्ट्रीय आपत्ती असून आपण माणुसकी धर्माचे पालन केले पाहिजे. गरिबांची सेवा हिच ईश्वर सेवा असल्याचे नमूद केले.